Breaking

फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी गेवराईत गुन्हा दाखल

Updated: जानेवारी 22, 2026

By Vivek Sindhu

ग्रामसेवकाच्या कामात अडथळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्याप्रकरणी गेवराई पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आरोपीवर ठेवण्यात आला आहे.

भरत अशोक दाभाडे या २२ वर्षीय तरुणाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. आरोपी सय्यद वाजीद सय्यद फाजील अहमद, राहणार मोगीनपुरा गेवराई, याने आपल्या ‘सय्यद वाजेद’ नावाच्या फेसबुक अकाउंटवरून हिंदू समाजाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान प्रसिद्ध केले होते. या पोस्टमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Categories

Recent Posts