Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
प्रदीप फाटे याच्यावर गुन्हा दाखल
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- ट्युशनला जात असलेल्या एका अल्पवयीन मुलीला कार मधून अपहरण करून तिच्यावर तिच्यावर बळजबरीने बलात्कार केल्या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील एका गावात राहत असलेली साडे पंधरा वर्ष वयाची एक अल्पवयीन मुलीची धीरज सांजुरे याच्याशी ओळख झाली. त्या ओळखीचा गैरफायदा धीरज सांजुरे याने घेण्याच्या उद्देशाने दि. ६ जानेवारी रोजी धीरज सांजुरे याने त्या अल्पवयीन मुलीला फिरायला जाण्याचे आमिष दाखविले. त्या नंतर सकाळी ती अल्पवयीन मुलगी केज येथे ट्युशनला जाण्यासाठी केज येथे आली असता सकाळी ९:३० च्या सुमारास धीरज सांजुरे त्या अल्पवयीन मुलीचे एका कार मधून अपहरण करून तिला धारूर तालुक्यातील अंबाचोंडी येथील डोंगरात घेऊन गेला. तिथे गेल्या नंतर एका निर्जनस्थळी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला.
त्या नंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीने ही माहिती तिच्या पालकांना दिल्या नंतर पालकांनी पीडित मुलीसह केज पोलिस ठाणे गाठून या घटनेची माहिती पोलिस अधिकाऱ्यांना दिली.
या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात गु. र. नं. ०९/२०२६ भा. न्या. सं. ६५(१), ६४(२)(एम), ८७, १३७(२) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६ प्रमाणे रात्री उशिरा गुन्हा करण्यात आला आहे.
याचा तपास पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.