Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सुर्डी पाटी जवळील हॉटेल समोर बेकायदेशीर दारू विक्रीवर युसफवडगाव पोलिसांचा छापा 

Updated: जानेवारी 6, 2026

By Vivek Sindhu

दहा हजारांच्या मुद्दे मालासह कार ताब्यात

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दहा हजारांच्या मुद्दे मालासह कार ताब्यात

गौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुर्डी फाट्यावर असलेल्या एका हॉटेल समोर अवैध्य दारू विक्रीवर पोलिसांनी छापा टाकून सुमारे १० हजार रु. ची अवैध्य दारू आणि एक कार ताब्यात घेतली आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज-कळंब महामार्गा क्र. ५४८- सी लगत युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुर्डी फाट्यावर असलेल्या हॉटेल वेलकम समोर अवैध्य चोरटी दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती युसुफवडगाव पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहिती वरून सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या आदेशाने दि. ५ जानेवारी रोजी रात्री १०:४५ वा. च्या सुमारास पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे आणि त्यांचे सहकारी पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले, गायकवाड यांनी छापा टाकला. 

त्यावेळी सदर ठिकाणी समर्थ संजय घुले वय (२४ वर्ष) (रा. ढोकी रोड कळंब जि. धाराशिव) हा अवैध्य व चोरटी दारू विक्री करीत असल्याचे पोलिस पथकाला आढळून आले. पोलिस पथकाने अवैध्य व चोरटी दारू विक्री करण्यासाठी त्याच्या ताब्यातील टँगो पंच, राजा संत्रा, टूबर, मॅकडॉल, मास्टर डिलाई ट या कंपनीच्या ९ हजार ८७० रु. चा मुद्देमालासह (एम एच- १२/एन इ-३०१९) ही राखाडी रंगाची डॅटसन रेडीगो कार यासह एकूण २ लाख ९ हजार ८७० रु. च्या मुद्देमालासह समर्थ घुले याला  ताब्यात घेतले आहे.

पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले यांच्या तक्रारीवरून समर्थ घुले याच्या विरुद्ध युसुफ वडगाव पोलिस ठाण्या गु र नं ०५/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल गित्ते हे तपास करीत आहेत.


Categories

Recent Posts