Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

उमापुरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल

Updated: नोव्हेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

उमापुरात अल्पवयीन मुलीचा बालविवाह; चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई गावातील 15 वर्षीय मुलीचा बालविवाह लावल्याप्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचीआणि इतर नातलगांविरुद्ध कारवाई सुरू असून तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक राजाभाऊ वंजारे करीत आहेत.

ग्रामपंचायत अधिकारी दिपक पांडुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 नोव्हेंबर रोजी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय बीड अंतर्गत चाइल्ड हेल्पलाइन 1098 कडून त्यांच्या मोबाईलवर संदर्भित मुलीच्या विवाहाचे फोटो प्राप्त झाले. त्यानंतर अधिक चौकशी करता मुलगी (वय 15) ही उमापुर येथील असून तिचा विवाह झाल्याची माहिती मिळाली. फोटोमध्ये मुलगी व मुलगा हार घातलेले, मंडप उभारलेला आणि नातलग उपस्थित असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत होती.

अधिकृत पडताळणीसाठी पांडुळे व ग्रामसेवकांनी गावात जाऊन तपास केला असता विवाह झाल्याचे समोर आले. मुलीचे वय खात्री करण्यासाठी शाळा दाखला तसेच आधार कार्डची प्रत तपासण्यात आली. अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधितांनी मुद्दामहून बालविवाह घडवून आणल्याचा निष्कर्ष नोंदवण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच चकलांबा पोलिसांनी कलम 9, 10 आणि 11 बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. तपास सुरू असून पोलिसांनी संबंधित नातलगांची भूमिका देखील तपासण्यास सुरुवात केली आहे.


Categories

Recent Posts