Breaking

बस चढताना महिलेचे गंठण लांबविले

Updated: June 28, 2025

By Vivek Sindhu

बस चढताना महिलेचे गंठण लांबविले

WhatsApp Group

Join Now

केज -केज शहरातील बसस्थानकावर दागिने चोरीची मालिका सुरू असून शुक्रवारी (दि. २७) बसमध्ये चढत असलेल्या एका महिलेचे दोन तोळ्याचे गंठण लांबविल्याची घटना घडली.
जिवाचीवाडी (ता. केज) येथील रामकुंवर तुळशीराम तोंडे ही महिला शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता बीडला जाण्यासाठी केज येथील बसस्थानकावर आली होती. लातूर – संभाजीनगर या बसमध्ये चढत असताना तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एक अनोळखी महिलेने त्यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण तोडून चोरून नेले. त्या अनोखी महिलेजवळ एक पर्स देखील असल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये दिसत आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.