Breaking
Updated: जानेवारी 27, 2026
आष्टीमध्ये घरफोडी; चोरट्यांनी लांबवले एक लाखाचे सोने
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelआष्टी: आष्टी शहरातील भोसले वस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका घराच्या खिडकीवाटे प्रवेश करून एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
साहेराव भाऊराव भोसले, वय ५० वर्षे, राहणार पिंप्री आष्टी, यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २५ जानेवारीच्या रात्री १०.३० ते २६ जानेवारीच्या सकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. चोरट्यांनी घराच्या पाठीमागील खिडकी उघडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले दागिने चोरून नेले. यामध्ये ३५ हजार रुपयांचे कानातील झुंबर, ५० हजार रुपयांचे सोन्याचे गंठण आणि १५ हजार रुपयांचे कानातील वेल अशा एकूण एक लाख रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे.
आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ३३१ (४) आणि ३०५ (ए) बीएनएस नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे या प्रकरणाचा तपास करत असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.