Breaking

बीएसएनएलच्या 5G सेवेला नाव मिळालं! ‘Q-5G’ म्हणजेच “Quantum 5G” ची भारतात घोषणा, ‘SIM-less’ फिक्स्ड वायरलेस सेवा देखील सुरू

Updated: June 19, 2025

By Vivek Sindhu

sGTMSE5aVXAHo6i2QzXFGe

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा

Join Group

नवी दिल्ली : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने आपल्या 5G सेवेसाठी ‘Q-5G’ हे नाव जाहीर केलं आहे. हे नाव ‘Quantum 5G’ चे लघुरूप असून नागरिकांच्या सूचनेनुसार निवडले गेले आहे. बीएसएनएलने बुधवारी आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर याची घोषणा केली.

BSNL ने केवळ नावच नाही, तर Q-5G अंतर्गत फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस (FWA) सेवाही भारतातील काही निवडक सर्कलमध्ये सुरू केली आहे. ही सेवा खास करून उद्योग आणि एंटरप्राइझ वापरकर्त्यांसाठी असून, ग्राहकांसाठी नाही. ही 5G FWA सेवा “SIM-less आणि वायरलेस” असून, देशी तंत्रज्ञानावर आधारित असल्याचे बीएसएनएलने सांगितले आहे.

Q-5G: वेग, ताकद आणि भविष्याची ओळख

बीएसएनएलच्या म्हणण्यानुसार, ‘Q-5G’ हे नाव देशातील नागरिकांकडून आले असून, त्यातून 5G नेटवर्कची ताकद, वेग आणि भविष्याचे दर्शन घडते. ‘Quantum 5G FWA’ ही सेवा केवळ डेटा पुरवते, यात व्हॉईस कॉलिंगची सुविधा नसेल. या सेवेचे मासिक शुल्क ₹999 पासून सुरू होणार आहे.

4G विस्ताराचीही तयारी

या घोषणेनंतर केंद्रीय ग्रामीण विकास व दूरसंचार राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी यांनी सांगितले की, बीएसएनएलच्या 4G सेवांच्या विस्तारासाठी दूरसंचार विभाग (DoT) लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव मांडणार आहे. ते म्हणाले, “आम्ही 1 लाख 4G टॉवर्स यशस्वीपणे बसवले आहेत. आता आणखी 1 लाख टॉवर्स बसवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाची मान्यता घेणार आहोत.”

आगामी योजना

बीएसएनएल आता अधिक 4G आणि 5G उपकरणे खरेदी करण्याच्या तयारीत आहे. त्याचबरोबर संस्थेच्या मालमत्तेचा सदुपयोग करून रोख प्रवाह वाढवण्याचे उद्दिष्टही आहे.