Breaking

बोरगाव चकला येथे घरफोडी; ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला

Updated: नोव्हेंबर 3, 2025

By Vivek Sindhu

बोरगाव चकला येथे घरफोडी; ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शिरूरकसार तालुक्यातील बोरगाव चकला येथे दुपारी दोन ते सहा या वेळेत अज्ञात चोरट्याने घरफोडी करत सुमारे ८३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली.

बबन दादावा झिजुर्डे (वय ६९, व्यवसाय शेती, रा. बोरगाव चकला, ता. शिरूरकसार, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्याने घराचे दरवाज्याचे आणि लोखंडी कपाटाचे लॉक तोडून घरात प्रवेश केला. घरातील ८० हजार रुपये रोख रक्कम, पाच सहावारी साड्या किंमत २,५०० रुपये आणि साक्षीदाराची १,२०० रुपयांची रक्कम असा एकूण ८३,७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

ही घटना १ नोव्हेंबर रोजी घडली असून २ नोव्हेंबर रोजी दुपारी १.५८ वाजता झिजुर्डे यांनी चकलांबा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या प्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Categories

Recent Posts