Breaking
Updated: जानेवारी 8, 2026
वृद्ध दिरास निलगिरीच्या लाकडाने केली मारहाण
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelनेकनूर: जमिनीची वाटणी करून दिली नाही या कारणावरून ८० वर्षीय वृद्ध वडिलांना त्यांच्याच मुलाने आणि नातवाने बेदम मारहाण केल्याची घटना लिंबागणेश येथे घडली आहे. परमेश्वर सावळाराम कुदळे हे ७ जानेवारी रोजी दुपारी आपल्या घरासमोर उभे असताना त्यांचा मुलगा विष्णू परमेश्वर कुदळे आणि नातू सचिन विष्णू कुदळे हे तिथे आले. त्यांनी वडिलांना जमिनीच्या वाटणीचा जाब विचारत शिवीगाळ सुरू केली. वडिलांनी उदरनिर्वाहासाठी जमीन स्वतःकडे ठेवल्याचे सांगताच आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला.
विष्णू कुदळे याने वडिलांना चापटबुक्क्यांनी मारहाण केली, तर नातू सचिन याने लाकडाने त्यांच्या हाताच्या बोटावर प्रहार करून त्यांना जखमी केले. रक्ताच्या नात्यातच जमिनीवरून झालेल्या या वादामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी परमेश्वर कुदळे यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुलगा आणि नातवाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार परजने या प्रकरणाचा तपास करत आहेत.