सावधानता अन सुरक्षिततेचे आवाहन
बीड – बिदूंसरा मध्यम प्रकल्प, मौजे पाली ता.जि. बीड येथे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून मोठया प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. या दृश्याचा अनुभव घेण्यासाठी नागरिक मोठया संख्येने धरण परिसरात गर्दी करत आहेत. मात्र सध्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक असून, नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.
धरण परिसरात गर्दी करु नये: पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असून, अचानक पाण्याची पातळी वाढू शकते.त्यामुळे नागरिकांनी धरण परिसरात जाणे टाळावे.
फोटो आणि सेल्फी टाळावेत: धरणाच्या काठावर उभे राहून फोटो किंवा सेल्फी घेणे अत्यंत धोकादायक आहे अशा कृतीमुळे अपघात होण्याची शक्यता वाढते.
पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे: मुलांना धरण परिसरात जाण्यापासून रोखावे आणि त्यांच्या हलचालीवर लक्ष ठेवावे.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे: स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
आपल्या आणि आपल्या कुंटूंबाच्या सुरक्षिततेसाठी वरील सूचनांचे पालन करणे अत्यांवश्यक आहे.धरण परिसरात कोणत्याही प्रकारचे बेजबाबदार वर्तन टाळावे.