Breaking

दुचाकीस्वार चोरट्यांनी पळवले ७८ हजारांचे गंठण

Updated: जानेवारी 27, 2026

By Vivek Sindhu

एटीएम कार्डची अदलाबदल करून ४० हजारांची फसवणूक

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड: बीड शहरात भररस्त्यात सोनसाखळी चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. किराणा सामान घेऊन घरी जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी हिसकावून नेले.

गिता पुरुषोत्तम भोसले, वय ३८ वर्षे, राहणार शंभुराजे नगर, बीड यांनी याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. गिता भोसले या आपल्या पती आणि मुलासह रिलायन्स स्मार्ट बाजार येथून सामान घेऊन परतत होत्या. जालना रोड ते बार्शी रोड दरम्यान द्वारकादास शामकुमार दुकानासमोरून जात असताना एका दुचाकीवरून दोन अज्ञात तरुण आले. त्यांनी गिता यांच्या गळ्यातील अंदाजे १४ ग्रॅम वजनाचे ७८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावले आणि वेगाने पसार झाले.

शिवाजीनगर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सोन्ने या घटनेचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.


Categories

Recent Posts