Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

चिंचोलीमाळी ते लाख  रस्त्याच्या कामाचे आ नमिताताई मुंदडा यांचे हस्ते भूमिपूजन 

Updated: जानेवारी 24, 2026

By Vivek Sindhu

चिंचोलीमाळी ते लाख रस्त्याच्या कामाचे आ नमिताताई मुंदडा यांचे हस्ते भूमिपूजन

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज, दि. 24 : केज तालुक्यातील चिंचोलीमाळी ते सारुकवाडी, डोका,, हादगाव, लाखा या 9 किमी रस्ता सुधारणाना कामाचे  भव्य भूमिपूजन शनिवारी  चिंचोलीमाळी येथे आ नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी आ नमिताताई मुंदडा यांनी 10 कोटी 28 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी भाजपाचे जिल्हा सचिव सुनिलआबा गलांडेपाटील होते.

प्रास्ताविक भाजपाचे जिल्हा सचिव सुनिलआबा गलांडेपाटील यांनी  करताना पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ प्रीतमताई मुंडे यांचा नामोल्लेख करून नंदकिशोर काकाजी मुंदडा, अक्षय भैय्या मुंदडा व आ नमिताताई मुंदडा या तिघांच्या  कार्याच्या मुंदडा पॅटर्नचे  तोंड भरून कौतुक केले.  व या मुंदडा पॅटर्नची राज्यभर चर्चा होत आहे असेही ते म्हणाले.व चिंचोलीमाळी ते साळेगाव, चिंचोलीमाळी ते सातेफळ व चिंचोलीमाळी ते शिरपूरा या तीन रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली . याप्रसंगी बोलताना आ नमिताताई मुंदडा यांनी 9 किमी लांबीचे हे काम दर्जेदार व्हावे आशा सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. आज पर्यंत चिंचोलीमाळी येथील गावांतर्गत सिमेंट रस्ते,जि प प्राथमिक उर्दू शाळा बांधकाम, तीर्थक्षेत्र विकास निधीतून संत नामदेव महाराज मंदिरासमोर सभागृह, व इतर सभागृह, आसे विविध विकास कामे केले आसून  आणखीनही उर्वरित कामे येणाऱ्या काळात करण्यात येतील आसे आश्वासन आ नमिताताई मुंदडा यांनी यावेळी बोलताना दिले.सूत्रसंचालन व आभार पत्रकार मधुकर सिरसट यांनी मानले

याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष भगवान केदार, डॉ वासुदेव नेहरकर, नेताजी शिंदे, सुरज घुले, प्राचार्य राहुल गदळे, सुदाम पाटील, सुनिल घोळवे, खदिर खुरेशी, ऍड शरद इंगळे, चंदू मिसाळ, चेअरमन अरुणतात्या काळे, उपसरपंच धिरज वनवे, व्हाइस चेअरमन आबासाहेब केदार, भुजंगदादा गलांडे दगडु दळवे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप गायकवाड, चंद्रकांत भुजबळ, राजाभाऊ नखाते, रविंद्र गलांडे, डॉ महेंद्र राऊत, रामराजे राऊत, शिवाजीआबा गायकवाड,मनोज गालफाडे, महारुद्र लिगाडे, अशोक पवार, योगेश बर्डे,सचिन जाधव,राजाभाऊ बंडू राऊत, संदीप गालफाडे, हारीभाऊ यादव , तुकाराम गालफाडे,बापुराव राऊत, सरपंच गोरख भांगे, बापुराव तोंडे, जगन्नाथ भांगे, राजाभाऊ भांगे, बळिराम भांगे,नाथराव भांगे, उपसरपंच श्रीराम वायबसे, मेजर हनुमंत वायबसे,आश्रुबा वायबसे, केशव भांगे, गणेश भांगे, फुलचंद चिंचकर, शहाजी ईंगळे,तानाजी फरके, बाजीराव काटे, संदिपान ईंगळे, बालासाहेब विभुते, दत्ता ईंगळे, कुंडलीक सालपे, अनिरुद्ध उबाळे,दशरथ थोरात, संदिपान घाडगे,केशव चव्हाण, रामचंद्र थोरात, शेषेराव शिंदे,राजेश तिडके, अनिल महाजन, उपसरपंच गणेश गालफाडे,भागवत मुळे, रुद्राप्पा बुरकुंडे, विकास शिंदे, महेश चंदनशिव, शिवाजी घोरपडे, हनुमंत सुरवसे, दादासाहेब आगे, रामकिशन कोठावळे, चंद्रसेन खाडे, आप्पासाहेब देशमुख, सतिश देशमुख, सुग्रीव सपाटे,विजय सपाटे, समाधान , बापुराव कापरे,  पोपट सत्वधर, बापुराव कापरे, तात्यासाहेब कापरे गणेश कापरे, राहुल कापरे, रविराज कापरे, बाबुराव कापरे यांच्या सह चिंचोली गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts