Breaking
Updated: May 27, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड : माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचे आज सोमवार, दिनांक २६ मे रोजी दुर्दैवी अपघातात निधन झाले. हा अपघात लातूर जिल्ह्यातील लातूर-औसा रस्त्यावरील बेलकुंडी गावाजवळ दुपारी घडला.
प्राथमिक माहितीनुसार, देशमुख हे त्यांच्या एसयूव्ही वाहनातून प्रवास करत होते. बेलकुंडीजवळ त्यांच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे गाडी पलटी झाली. या भीषण अपघातात देशमुख गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अपघाताच्या घटनेमुळे संपूर्ण भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर. टी. देशमुख हे माजलगाव मतदारसंघातून आमदार म्हणून कार्यरत होते. त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले होते. त्यांच्या निधनाने एक अनुभवी व प्रगल्भ नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.