Breaking
Updated: July 19, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupअंबाजोगाई – भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई शहरची कार्यकारिणी शुक्रवार, दिनांक १८ जुलै रोजी जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, जेष्ठ नेते नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. अंबाजोगाई शहरची जम्बो कार्यकारिणीत ६३ जणांचा आणि मोर्चा व आघाडीचे मंडळ अध्यक्ष म्हणून ५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई शहर अध्यक्ष संजय गंभीरे यांनी दिली आहे.
भारतीय जनता पक्ष अंबाजोगाई शहर अध्यक्ष संजय गंभीरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, केज मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार नमिताताई मुंदडा, राज्य परिषद सदस्य अक्षयजी मुंदडा, जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, जेष्ठ नेते नंदकिशोर (काकाजी) मुंदडा या सर्वांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
शुक्रवारी आमदार नमिताताई मुंदडा यांच्या संपर्क कार्यालयात जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, जेष्ठ नेते नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख यांनी भाजपा समाजातील सर्व समाज घटकांना न्याय देणारा पक्ष आहे. भाजपचे माध्यमातून देश प्रगतीपथावर जात आहे. आपण ही आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी करावा, पक्ष संघटना बळकट करावी असे आवाहन केले. तर जेष्ठ नेते नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांनी सांगितले की, केज मतदारसंघात भाजपाने विकास प्रक्रिया गतिमान केली आहे. अनेक कामे केली आहेत. अनेक कामे होत आहेत.
प्रगतीपथावर आहेत व अनेक नव्या कामांना आमदार नमिताताई व अक्षय मुंदडा यांनी मंजुरी व निधी उपलब्ध करून दिला आहे.केज मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करणे हेच आपले सर्वांचे ध्येय आहे. याकामी आपण नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन भाजपा पक्षाला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवा असे आवाहन श्री मुंदडा यांनी केले. यावेळी सुत्रसंचालन व प्रास्ताविक शहराध्यक्ष संजय गंभीरे यांनी केले.
तर उपस्थितांचे आभार नवनिर्वाचित ओबीसी मोर्चा अध्यक्ष शैलेश स्वामी यांनी मानले. याप्रसंगी अंबाजोगाई शहरची जम्बो कार्यकारिणीत ६३ जणांचा आणि मोर्चा व आघाडीचे मंडळ अध्यक्ष म्हणून ५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वप्रथम या कार्यकारिणी मध्ये निवड झालेल्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी मनःपुर्वक हार्दिक अभिनंदन केले. आणि पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या. अंबाजोगाई शहराच्या जम्बो कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून प्रशांत आदनाक, डॉ.सुधीर धर्मपात्रे, विनोद पोखरकर, कल्याण काळे, उषा यादव, दीक्षा अतुल कसबे, सरचिटणीस म्हणून डॉ.निशिकांत पाचेगावकर आणि अजित सांगळे, चिटणीस म्हणून राणा चव्हाण, विष्णू पांचाळ, गोविंद शिंपले, राजकुमार गायके, बालाजी शेरेकर, अल्का संतोष, कोषाध्यक्ष सत्यप्रेम इंगळे, तर कार्यकारिणी सदस्य म्हणून अजय राठोड, नाना गायकवाड, प्रताप देवकर, अक्षय भुमकर, बाळू भराडीया, रमेश जाधव, मोहित कराड, माऊली वैद्य, गौतम बडे, सचिन केंद्रे, सचिन वाघमारे, ऍड.अरविंद मोटेगावकर, शैलजा पंडित जोगदंड, मीरा दीपक मस्के, सविता महादू मस्के, उज्ज्वला बाला पाथरकर, रतन नेमीचंद संघई, सपना निखिल डहाळे, पूजा अनिल धोत्रे, निकिता धम्मदीप सरवदे, जयश्री सुरेश कराड, रेहाना मतलूब शेख, सारिका निकेश जगदाळे, सुप्रिया राहुल कापसे, हिंदवी ओमकार पोतदार, आर्शिया साजेद मोहम्मद, दीप्ती दिग्विजय लोमटे, चंद्रकांत बनसोडे, अविनाश साठे, महादेव गव्हाणे, प्रसाद कोठावळे, मोबीन पठाण, प्रविण भाकरे, अक्षय लोमटे, अतिकांत कांबळे, संजय गायसमुद्रे, मुस्तफा रेगीवाले, मतीन बागवान, दानिश शेख, ताबीज सिद्दीकी, शेख इर्शाद, सचिन जोगदंड, शाकेर बागवान, खलील बागवान, ताहेर शेख, सुजात शेख आणि अक्षय शिंदे यांचा समावेश आहे. तर मोर्चा व आघाडी मंडळ अध्यक्ष म्हणून रजिया अहमद पप्पुवाले (महिला मोर्चा), महेश अंबाड (युवा मोर्चा), शेख रौफ (अल्पसंख्यांक मोर्चा), संतोष शिनगारे (अनुसूचित जाती मोर्चा) आणि शैलेश स्वामी (ओबीसी मोर्चा) यांचा समावेश आहे. अशी माहिती भाजपाचे अंबाजोगाई शहराध्यक्ष संजय शहाजीराव गंभीरे यांनी दिली आहे.
सर्वसमावेशक अंबाजोगाई शहर कार्यकारिणी :
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे, केज मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार नमिताताई मुंदडा, राज्य परिषद सदस्य अक्षयजी मुंदडा, जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख, जेष्ठ नेते नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टी अंबाजोगाई शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अंबाजोगाई शहरची जम्बो कार्यकारिणीत ६३ जणांचा आणि मोर्चा व आघाडीचे मंडळ अध्यक्ष म्हणून ५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही कार्यकारिणी सर्वसमावेशक आहे. विविध समाज घटकांना सोबत घेऊन भाजपाने त्यांना न्याय दिला आहे. पुढील काळात केज मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार नमिताताई मुंदडा, राज्य परिषद सदस्य अक्षयजी मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली आणि जेष्ठ नेते नंदकिशोर (काकाजी) मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भाजपा प्रेमी नागरिकांना सोबत घेऊन अंबाजोगाई शहर भाजपामय करण्याचा प्रयत्न केला जाईल.
~ संजय गंभीरे
(शहराध्यक्ष, भाजपा अंबाजोगाई.)