Breaking

भरधाव टेम्पोच्या धडकेत मजुराचा मृत्यू, जनावरेही ठार

Updated: सप्टेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

भरधाव टेम्पोच्या धडकेत मजुराचा मृत्यू, जनावरेही ठार

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : शिरुर–राजुरी रोडवरील सोनार शेताजवळ डांबरी रस्त्यावर भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला असून जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडली.

भाउसाहेब महादेव काळे (वय ३०, व्यवसाय मजुरी, रा. नवगण राजुरी, ता. व जि. बीड) हा रस्त्यावर असताना टेम्पो क्र. MH11 AL 2863 हा चालक हुसेन अहमद शेख (रा. मोहम्मदीया कॉलनी, बीड) याने भरधाव वेगात, निष्काळजीपणे व हयगयीने चालवून मागून जोराची धडक दिली. या धडकेत काळे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाला.

या अपघातात फिर्यादी कौशल्या महादेव काळे (वय ५०, रा. नवगण राजुरी) यांच्या दोन म्हशी वगारू झाल्या, दोन शेळ्या ठार झाल्या तसेच चार म्हशी व तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले.

या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोह. मुंडे करीत आहेत.


Categories

Recent Posts