Breaking

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षे सश्रम कारावास; बीड सत्र न्यायालयाचा निकाल

Updated: जानेवारी 13, 2026

By Vivek Sindhu

Picsart 26 01 13 18 15 15 940 scaled

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

गेवराई: तालुक्यातील रामपुरी येथे एका सहा वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात बीड सत्र न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. या घटनेतील नराधम आरोपीला न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे पीडित मुलीला अखेर चार वर्षांनंतर न्याय मिळाला असून पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

रामपुरी येथील एका सहा वर्षीय बालिकेवर ४ मे २०२२ रोजी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी सुंदर निवृत्ती तायडे (वय ३४, रा. रामपुरी, ता. गेवराई) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पिंक पथकातील महिला पोलीस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी तातडीने तपास चक्र फिरवून आरोपीला अटक केली होती. तपासादरम्यान सहाय्यक पोलीस फौजदार भगवान खाडे, महेश झिकरे आणि ज्योती साळुंखे यांनी मोलाची भूमिका बजावली.

पोलिसांनी या प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्यादरम्यान समोर आलेले साक्षीदार आणि तांत्रिक पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी सुंदर तायडे याला दोषी ठरवले. १२ जानेवारी २०२६ रोजी न्यायालयाने आरोपीला विविध कलमान्वये २० वर्षांच्या शिक्षेची सुनावली. या खटल्यात पोलीस हवालदार गव्हाणे यांनी कोर्ट पैरवी म्हणून उत्तम कामगिरी केली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. या निकालामुळे सामान्य जनतेत समाधान व्यक्त केले जात असून बीड पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.


Categories

Recent Posts