Breaking
Updated: नोव्हेंबर 12, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelबीड : जिल्हा पोलिस दलाने आज दि. 12 नोव्हेंबर 2025 रोजी बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण व वाहतूक शिस्त प्रस्थापित करण्यासाठी विशेष मोहीम राबवली. पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांच्या संकल्पनेतून व जिल्हा वाहतूक शाखेच्या समन्वयातून ही मोहीम घेण्यात आली.
बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी टोलनाका, बार्शी नाका बीड, साठे चौक वडवणी, केज टोल नाका, चुंभळी फाटा पाटोदा, गोमाळवाडा फाटा शिरूर, धारुर टोल नाका, बर्दापूर टोल नाका, परभणी टी पॉईंट माजलगाव, ईटके कॉर्नर परळी आणि आंभोरा चेक पोस्ट अशा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती.
या कारवाईत एकूण 1340 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून मागील प्रलंबित दंडासह एकूण ₹11,08,950 इतका दंड वसूल करण्यात आला.
या मोहिमेचे मार्गदर्शन पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांनी केले. जिल्हा वाहतूक शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी आणि अंमलदार यांनी या कारवाईत सहभाग घेतला.