Breaking
Updated: नोव्हेंबर 8, 2025
बसमध्ये चढताना महिलेचे मणीमंगळसुत्र लांबविले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढत असलेल्या महिलेचे मणीमंगळसुत्र लांबविल्याची घटना केज येथील बसस्थानकावर घडली.
तांबवा (ता. केज) येथील मीरा शिवाजी चाटे या मुलीला दवाखान्यात घेऊन अंबाजोगाईला निघाल्या होत्या. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता येथील बसस्थानकातून अंबाजोगाईकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांची मुलगी दिपाली यांच्या गळ्यातील २४ हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅमचे मणीमंगळसुत्र लांबविले. त्यांच्या गळ्याला हिसका बसल्याने त्यांनी गळ्याला हात लावून बघितल्यावर हा प्रकार उघडकीस आला. मीरा चाटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास जमादार विष्णू नागरगोजे हे करीत आहेत.