Breaking

बँक सक्षम करण्यासाठी सहभाग घेवून  बँक पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत

Updated: सप्टेंबर 29, 2025

By Vivek Sindhu

बँक सक्षम करण्यासाठी सहभाग घेवून

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

बीड – एकरक्कमी कर्जफेड योजनेस 90 टक्के व्याजदराने मुदतवाढ देण्याबाबत बँकेचे प्राधिकृत अधिकारी समिती विचार विनिमय करुन निर्णय घेण्यात येईल तसेच पगारदार पतसंस्थेच्या कर्जाच्या व्याजदराबाबत इतर बँकेचा व्याजदर विचारात घेवुन त्यानुसार व्याजदर कमी करणे बाबत निर्णय घेण्यात येईल. यापुर्वी बँकेची आर्थिक स्थिती चांगली होती. परंतु दरम्यानच्या कालावधीत बँकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने आपण सर्व सभासद व कर्मचारी यांनी एकत्र येवून जास्तीत जास्त ठेवी वाढवुन बँक सक्षम करण्यासाठी सहभाग घेवून, बँक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 70 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सभागृहात आयोजित केली होती त्यावेळी त्यांनी केले.

या सभेस प्राधिकृत अधिकारी समिती सदस्य सतीश तोटावार, सतीश पोकळे,  अशोक कदम, अॅड. अशोक कवडे, सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन, वैयक्तीक सभासद, पदाधिकारी, गटसचिव, बँकेचे अधिकारी कर्मचारी यांच्यासह विविध संस्थाचे प्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

           जिल्हा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला बॅकेचे हप्ते दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत भरणा करु शकणार नाहीत. तरी सदर योजनेस किमान एक वर्षाची मुदतवाढ देण्यात यावी, तसेच पगारदार पतसंस्थेस बँक सध्या आकारत असलेले व्याजदर हे इतर बँकेपेक्षा जास्त असल्याने पगारदार पतसंस्थेकडे सभासद कर्ज घेत नाहीत. त्यामुळे इतर बँका असलेला व्याजदर विचारात घेवून त्यानुसार आपले बँकेचा व्याजदर कमी करण्यात यावा अशा सूचना सभेमध्ये सभासदाकडून करण्यात आल्या. तसेच बँक कर्मचारी संघटनेच्या वतीने अतिवृष्टीधारक पुरग्रस्त शेतक-यांना मा. मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये रक्कम जमा करणेसाठी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन  यांच्याकडे पाच लाख रुपयाचा धनादेश संघटनेचे अध्यक्ष  प्रताप माने यांनी सुपूर्द केला.

सभेचे अध्यक्ष म्हणून बँकेचे प्राधिकृत अधिकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे नांव सूचविण्यात आले. त्यास बँकेचे प्र. व्यवस्थापक रविकुमार उबाळे यांनी अनुमोदन दिले. सभेच्या सुरुवातीस दिवंगत झालेल्या व्यक्तीना व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. बँकेची वार्षिक सभा सुरु होण्यापूर्वी मान्यवर प्रमुख अतिथी व सन 2024-2025 या आर्थिक वर्षात 100 टक्के वसुली करणाऱ्या सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व सचिवांचा प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

सदर वार्षिक सभेला सदर सभेमध्ये मागील सभा दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, दिनांक 31 मार्च 2025 अखेर पूर्ण झालेल्या आर्थिक वर्षाच्या बँकेच्या कामकाजाचा अहवाल, नफातोटा पत्रक, ताळेबंद पत्रक यास मान्यता, सन 2024-2025 च्या अंदाज पत्रकातील तरतुदीपेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मान्यता व सन 2025-2026 च्या उत्पन व खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्याबाबत मान्यता, दिनांक 31.03.2025 अखेरील शिल्लक असलेल्या नफा विनियोगास मान्यता, सन 2023-2024 च्या वैधानिक लेखा परिक्षण अहवालावरील दोष दुरुस्ती अहवालास मान्यता व सन 2024-2025 च्या वैधानिक लेखा परिक्षणाच्या अहवालाची नोंद घेणे व सन 2025-2026 च्या वार्षिक लेखा परिक्षण करणेसाठी सनदी लेखापालाची नेमणूक करणे असे विषयसुची प्रमाणे 1 ते 7 विषयास सभेमध्ये सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

      प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी शरद ठोंबरे यांनी तर  प्राधिकृत अधिकारी समितीचे सदस्य अॅड. अशोक कवडे यांनी सर्वांचे आभार आभार मानले.


Categories

Recent Posts