Breaking
Updated: July 3, 2025
WhatsApp Group
Join Nowबीड – गेवराई तालुक्यातील चकलांबा ठाणे हद्दीत गोदावरी नदीपात्रात अवैधरीत्या वाळू उत्खनन करणाऱ्यांकडून पोलिसांनी २७ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी (दि.२) झालेल्या या कारवाईमुळे वाळूमाफियांमध्ये खळबळ उडाली.
विकास संपत केसभात (रा. गायकवाड जळगाव), मोहम्मद अहमद शेख (रा. सुकली रा. शेवगांव जिल्हा अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत. बुधवारी महारटाकळी येथे नदीपात्रात एक ट्रॅक्टर चोरटी वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला असता यावेळी वाळू तस्करी करणारे टॅक्टर व एक जेसीबी आढळून आले. त्यानुसार दोन्ही वाहने ठाण्यात आणण्यात आली असून या कारवाईत २७लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, पोलिस उपअधीक्षक राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संदीप पाटील पोह. अमोल अंकुश येळे, पो.शि. कैलास खटाने, पो.शि. प्रशांत कल्याण घोंगडे आदींनी केली आहे.