Breaking

राज्याच्या सर्वांगीण विकासावर आमदार नमिता मुंदडा यांचे सभागृहात प्रभावी भाष्य; विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

Updated: फेब्रुवारी 26, 2026

By Vivek Sindhu

विविध मागण्यांकडे वेधले लक्ष

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

मुंबई: राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत सहभागी होत केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांनी राज्याच्या आर्थिक प्रगतीसह विविध लोकहितकारी विषयांवर आपली भूमिका मांडली. मुंबई येथील विधिमंडळ सभागृहात झालेल्या या चर्चेदरम्यान त्यांनी कृषी, उद्योग, पायाभूत सुविधा आणि महिला सक्षमीकरण या क्षेत्रांतील शासनाच्या धोरणांचे स्वागत करत मतदारसंघासह राज्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या सादर केल्या.

आमदार मुंदडा यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या मुद्द्यांवर भर दिला. राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या योजना आणि किमान आधारभूत किमतीनुसार (एमएसपी) होणारी खरेदी या प्रक्रियेत अधिक सातत्य राखण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे मजबूत करणे आणि प्रस्तावित ग्रीनफिल्ड महामार्गामुळे होणारा औद्योगिक विकास राज्याच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सौर ऊर्जा योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण जीवनमान उंचावण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या ‘उमेद’ अभियानाचे कौतुक करताना त्यांनी महिला सक्षमीकरणाच्या कक्षा अधिक रुंदावण्याची मागणी केली. आरोग्य सेवांची उपलब्धता आणि पर्यावरण रक्षणासाठी सुरू असलेल्या हरित महाराष्ट्र उपक्रमाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. राज्यातील औद्योगिक विकासासोबतच पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज असून, सरकारने या दिशेने घेतलेले निर्णय आश्वासक असल्याचे मत त्यांनी मांडले. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी प्रशासकीय स्तरावर काही सुधारणा सुचविल्या.


Categories

Recent Posts