Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

सारडगाव ग्रामपंचायत कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न; ग्रामसेवकाच्या कामात अडथळा

Updated: जानेवारी 29, 2026

By Vivek Sindhu

ग्रामसेवकाच्या कामात अडथळा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

परळी: परळी तालुक्यातील सारडगाव ग्रामपंचायत कार्यालयात घरकुलाच्या हप्त्यावरून एका व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी रोहित बालाजी सोनवणे (वय २६, रा. घाटनांदूर), जे सारडगाव येथे ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, आपले शासकीय कामकाज करत होते. यावेळी आरोपी वैभव दगडू आघाव (रा. सारडगाव) हा तेथे आला आणि ‘माझ्या घरकुलाचा हप्ता शुक्रवारी का पडला नाही?’ असे म्हणत वाद घालू लागला. रागाच्या भरात त्याने ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे रजिस्टर फाडले आणि टिपॉय फोडून नुकसान केले.

इतक्यावरच न थांबता आरोपीने स्वतःच्या आणि पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून काडीपेटीने पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादी आणि साक्षीदारांना धक्काबुकी करून कामात अडथळा आणला. परळी ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.


Categories

Recent Posts