Breaking
Updated: फेब्रुवारी 13, 2026
एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगौतम बचुटे/केज :- केज तालुक्यातील अनुसूचित जातीच्या महिला सरपंच यांच्या पतीस एकाने सोशल मीडियावर अश्लील आणि जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी एकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिवाचीवाडी ता. केज येथील अनुसूचित जातीच्या सरपंच सौ. प्रेरणा काळे यांचे पती दीपक रामभाऊ काळे आणि बंडू नारायण चौरे हे दोघे वॉट्सअपच्या सन २२ – २३ इलेक्शन टीम या नावाच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सहभागी आहेत. या ग्रुपवर बंडू चौरे याने दीपक काळे यांना अनेकदा अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्याच बरोबर जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. ११ फेब्रुवारी रोजी रात्री दीपक काळे यांनी दिलेल्या तक्रारी वरून बंडू चौरे याच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ६५/२०१६, भा. न्या. सं. २९६, ३५१(२) यासह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये ३(१), (एस), ३(२)(व्ही ए) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
प्रभारी सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे हे तपास करीत आहेत.