Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे वाचवले प्राण; पेठ बीड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Updated: डिसेंबर 30, 2025

By Vivek Sindhu

आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या तरुणाचे वाचवले प्राण; पेठ बीड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड : ​बीडमध्ये एका ३० वर्षीय तरुणाने आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असा मेसेज टाकत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला, मात्र पेठ बीड पोलिसांनी तांत्रिक मदतीने वेळीच शोध घेत या तरुणाचे प्राण वाचवले आहेत. ही घटना ३० डिसेंबर २०२५ रोजी घडली असून रोहित बंडू वीर असे या तरुणाचे नाव आहे. रोहितने आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून आणि फोन बंद करून कोणालाही काहीही न सांगता घर सोडल्याने त्याच्या नातेवाईकांनी तातडीने पेठ बीड पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांनी तातडीने शोध पथक रवाना केले. तांत्रिक शाखेच्या मदतीने पोलिसांनी रोहितचा मागोवा घेतला असता, तो ग्रँड यशोदा हॉटेलच्या पाठीमागील एका इमारतीवर आत्महत्येच्या तयारीत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्याला ताब्यात घेऊन त्याचे समुपदेशन केले आणि त्याला सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले.

​या कामगिरीत पोलीस निरीक्षक मारोती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मन्सूर शहा, पोलीस कर्मचारी बाप्पासाहेब दराडे आणि पांडुरंग परजणे यांनी मोलाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार यांनी या पथकाचे कौतुक केले आहे. किरकोळ कारणावरून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले आयुष्य संपवू नये, असे आवाहन यानिमित्ताने पोलिसांनी नागरिकांना केले आहे.


Categories

Recent Posts