Breaking

जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा

Updated: सप्टेंबर 29, 2025

By Vivek Sindhu

बीड जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – बीड जिल्ह्यातील बीड तालुका येथील पाली व कुर्ला, गेवराई तालुक्यातील हिरापूर व इटकूर ,शिरूर कासार तालुक्यातील निमगाव नांदेवली,ब्राह्मनाथ येळंब व सवसवाडी आदी पूरग्रस्त भागाची पाहणी करून या गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाली भिजून वाहून गेलेल्या घरांना भेटी दिल्या.

व्यथा मांडताना घर उध्वस्त झालेल्या कुटुंबाचे अश्रू अनावर झाले होते.

गावातील शेतकरी बांधवांचे सर्वस्व या पावसाने हिरावून घेतले आहे. उभं आयुष्य कष्ट करून शेतीतुन चार पैसे हाती येतील म्हणूल शेतकरी राबला मात्र हाताशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला सोयाबीन, कापूस व खरीप पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे कष्ट डोळ्यासमोर वाहून गेलेले पाहून मन हेलावून गेले. जनावरांसाठीचा चारा, शेतातील बियाणे, साठवलेले अन्नधान्य – सगळं काही वाहून गेलं आहे. डोळ्यादेखत जनावरे वाहून जाताना बघून वेदना सांगताना शेतकऱ्यांचा बांध फुटला होता

शेतकरी शेतमजूर, व्यापारी बांधवांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुकानात पाणी घुसल्याने संसाराचा गाडा उभा करणाऱ्या अनेक कुटुंबांवर मोठे संकट आले आहे. इथलं आभाळच फाटलय पण अस्मानी संकटे पेलताना सरकारने तात्काळ भरीव मदत करावी अशा सूचना जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडळ अधिकारी, यांच्याशी संवाद साधून घरांची पडझड, शेतीतील नुकसान व व्यापारी बांधवांचे नुकसान याबाबत तात्काळ मदत देण्याच्या सूचना दिल्या.

या पाहणी दौऱ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अशोकराव पाटील खा. डॉ. शिवाजीराव काळगे , प्रदेश सरचिटणीस दादासाहेब मुंडे, गणेश राऊत,जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रविणकुमार शेप, नवनाथ थोटे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रीनिवास बेदरे, बीड तालुकाध्यक्ष गणेश बजगुडे, गेवराई तालुका अध्यक्ष महेश बेदरे, शिरूर तालुका अध्यक्ष भास्कर केदार, बीड शहराध्यक्ष परवेज खुरेशी, राजाराम पवार, प्रताप मोरे, प्रवीण सोट, गणेश जवकर , महिला तालुकाध्यक्ष विविध गावातील ,सरपंच ,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Categories

Recent Posts