Breaking

आष्टी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; गावागावात भीतीचे सावट

Updated: नोव्हेंबर 20, 2025

By Vivek Sindhu

आष्टी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ; गावागावात भीतीचे सावट

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

कडा: आष्टी तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ वाढत असून घाटा पिंपरी, देवळाली, दादेगाव, सावरगाव, सांगवी पाटण, खिळद, डोईठाण, कोहिनी, किन्ही, बेलगाव, बावी, कारखेल, दरेवाडी आणि धामणगाव या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आज अहिल्यानगर–बीड महामार्गावर बिबट्याचा मुक्त संचार दिसून आला. तर सायंकाळी सांगवी पाटण येथील सुदर्शन विद्यालयासमोर बिबट्या दिसल्याने गावकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. मागील पाच दिवसांपासून बिबट्याची सतत हालचाल सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेक नागरिक अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत.

वनविभागाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या असून लहान मुलांना घराबाहेर एकटे न पाठवणे, रात्री पाळीव जनावरे सुरक्षित गोठ्यात बांधणे, घराभोवतीची झुडपे व कचरा तातडीने हटवणे यासह रात्री बाहेर पडताना तेजस्वी टॉर्चचा वापर करावा असे आवाहन केले आहे.

दरम्यान, वनविभागाचे पथक परिसरात गस्त वाढवून असून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. काही ठिकाणी पावलांचे ठसे आणि हालचालींची चिन्हे आढळून आली आहेत. बिबट्या दिसल्यास गोंधळ न करता त्वरित पोलिस किंवा वनविभागाला कळवावे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. परिसरात भीतीचे वातावरण असले तरी नागरिकांनी शांतता राखून सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


Categories

Recent Posts