आष्टी : आष्टी शहरातील सरकारी दवाखाण्याच्या पाठीमागे असलेल्या संमिश्र नगर येथे एका वडापाव विक्रेत्याच्या घरात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घराचा कडीकोंडा तोडत घरात प्रवेश करून रोकड व सोन्याचे मनी असा सुमारे पन्नास हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
पोपट रामभाऊ चौधरी असे फिर्यादीचे नाव असून ते संमिश्र नगर, आष्टी येथे राहतात. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ७ ऑगस्टच्या मध्यरात्री १२.३० वाजल्यापासून सकाळी ६.४५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या खोलीचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट फोडून त्यामधील रोख ४०,००० रुपये व अंदाजे १.५ ग्रॅम सोन्याचे जुने मनी, किमती सुमारे १०,००० रुपये असा एकूण ५०,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
या घटनेनंतर पोपट चौधरी यांनी आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.सं. नविन कलम ३०५ (अ), ३३१ (४) अंतर्गत गुरनं. ३७३/२०२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल तांदळे करीत आहेत