आष्टी : आष्टी शहरातील एस.टी. बसस्थानक परिसरात झालेल्या अपघातात ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी स्विफ्ट कार चालकाशिविरोधात निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यू घडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाळु गहिनीनाथ भुकन (वय ४१, रिक्षा चालक, रा. भुकनवस्ती, टाकळी अमिया, ता. आष्टी) यांनी आष्टी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांचे वडील भगवान देवराव भुकन (वय ६३) हे आपल्या बहिणीकडे जाण्यासाठी एस.टी. बसने प्रवास करण्यासाठी आष्टी बसस्थानक परिसरात आले होते. यावेळी स्विफ्ट कार (MH12EG0724) चालवणाऱ्या शेख असलम अकबर याने निष्काळजी व बेफिकिरीने वाहन चालवत त्यांच्या वडिलांना जोरदार धडक दिली. या धडकेमुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर बाळु भुकन यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार आष्टी पोलिसांनी आरोपी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गिराम हे करीत आहेत.