Breaking
Updated: जानेवारी 17, 2026
हेल्मेट, सीटबेल्ट वापरणेसह अपग्रस्तांना मदतीचे केले आवाहन
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelहेल्मेट, सीटबेल्ट वापरणेसह अपग्रस्तांना मदतीचे केले आवाहन
केज – केज शहरात रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अंबाजोगाई, पोलीस स्टेशन, केज आणि रोटरी क्लब, केज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा आणि अपघात टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा पदयात्रा काढण्यात आली.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सहाय्यक पोलीस अधीक्षक वेंकटराम यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर पदयात्रेस सुरुवात झाली. पदयात्रा ही छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे, बसस्थानक, भवानी चौक चौक मार्गे रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पोहचली. पदयात्रेत पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, उपप्रदेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद गौस चांदपाशा, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय केंद्रे, रोटरीचे अध्यक्ष सत्यवान राऊत, हनुमंत भोसले, मोटर वाहन निरीक्षक दत्तात्रय पांडकर, मोटर वाहन निरीक्षक भूषण कचरे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक ऐश्वर्या कराड, अमोल रंगवाड, शुभम लवळे, आर. जी. कुलकर्णी, फौजदार सुकुमार बनसोडे यांची प्रमुख होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक धनंजय खोसे हे होते.
पदयात्रेतून विद्यार्थ्यांसह नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षिततेची जाणीव निर्माण करून देत हेल्मेट आणि सीटबेल्ट वापरण्याची सवय रुजविण्याचे आवाहन केले. तर अपघात प्रसंगात समाजहित साधण्याचे महत्त्व अधोरेखित करीत रस्ता सुरक्षित ठेवणे ही व्यक्तिगत जबाबदारी आणि समाजाची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे महत्त्वाचे साधन असल्याचे स्पष्ट केले.
पदायात्रेच्या समारोपप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी, शिक्षकांसह नागरिकांना अपघात टाळण्यासाठी काळजी घेणे, हेल्मेट व सीटबेल्ट वापरणे, नियमांचे पालन करणे आणि अपघात प्रसंगात नागरिकांना मदत करण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक व्यक्तीने रस्ते सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, कारण ही फक्त वैयक्तिक नव्हे तर समाजहिताची जबाबदारी आहे, असे मत मांडले.