Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने काम करावे -अपारंपारिक ऊर्जा संचालक सुमन चंद्रा

Updated: डिसेंबर 22, 2025

By Vivek Sindhu

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकाऱ्यांनी स्वयंप्रेरणेने काम करावे -अपारंपारिक ऊर्जा संचालक सुमन चंद्रा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – आकांक्षित तालुका अंतर्गत वडवणी मधील प्रगती चांगले आहे. यापुढील काळातही यापेक्षा अधिक गतीने काम करून विशेषत्वाने महिलांचे जीवनमान उंचवावे जेणेकरून येथील बालविवाहाचे प्रमाण कमी होऊ शकते. कोणी येऊन काम करेल याची वाट न बघता सर्व अधिकाऱ्यांनी हे आपलेच काम समजून स्वयं प्रेरणेने काम करण्याची गरज आहे. हो सर्वांनी करावे असे आवाहन नवीन आणि नवीनिकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या संचालक सुमन चंद्रा यांनी आज येथे केले.

    आकांक्षित तालुका विकास कामाचा आढावा आज एका बैठकीत घेण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान तसेच अपर जिल्हाधिकारी हरीश धार्मिक, जिल्हा नियोजन अधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थित होती.

     देशात 500 ब्लॉक मधील तालुक्यामध्ये हा आकांक्षित तालुका कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मागासलेल्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट केंद्र शासनाने ठेवलेले आहे. यामध्ये वडवणी तालुका देशात 117 व्या क्रमांकावर असून  चार झोन  अंतर्गत 69 ब्लॉक मध्ये बारावा आणि राज्यात  वडवणी तालुका कामाच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे.

     या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी, सामाजिक विकास आणि पायाभूत सुविधा या सात मुद्द्यावर आधारित उद्दिष्टे ठरवून विकास करावयाचा आहे. बीडमध्ये बदल घडत आहे याचा संदेश दिला गेला पाहिजे. या ठिकाणी असणाऱ्या बालविवाह समस्येचे मूळ विविध कारणांमध्ये आहे. त्यामुळे मुलींचे शिक्षण त्यांचे समाजातील स्थान आणि त्यांच्या कार्याचे मोल या मुद्दयांवर लक्ष दिले गेले पाहिजे असे सुमन चंद्रा यावेळी म्हणाल्या.

      समस्येचा शोध घेतला आहे त्याची योग्य कारणमीमांसा व त्यावर सकारात्मकपणे उपाय योजना या माध्यमातून विकास साधता येईल, असे सांगून त्या म्हणाल्या की, बालविवाहाच्या समस्येवर लक्ष केंद्रित करताना त्याला प्राधान्य दिले तर बालविवाह करण्याचे प्रमाण कमी होईल.

      मुलींना शिक्षणात प्राधान्य देण्याबाबत प्रसिद्धी तसेच प्रत्यक्ष यांच्यात जाणीव जागृती गरजेची आहे. कार्यक्रमांतर्गत बचत गटांना केवळ मर्यादित भूमिकेत न ठेवता त्यांना उद्योग प्रशिक्षण आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. या गटांना मुद्रा कर्ज योजनेतून अधिकाधिक व्यवसाय आणि उद्योग यासाठी प्रोत्साहित करण्यासोबतच प्रशिक्षित करण्याची गरज आहे. असे सुमन चंद्रा यावेळी म्हणाल्या.

      विकासाचा आढावा केवळ आकडेवारीवर न घेता प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या जीवनात त्याचा किती लाभ झाला आहे याचे चित्रण आगामी काळात मांडावे. अशा सूचना सुमन चंद्रा यांनी यावेळी दिल्या.                       शक्य तितक्या प्रमाणात आवास योजना तसेच प्रधानमंत्री सूर्यघर आणि शेतकऱ्यांसाठी च्या सुमन योजने अंतर्गत अधिकाधिक लाभ देण्याच्या दृष्टीने अभ्यास करा व माहिती सादर करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले


Categories

Recent Posts