Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा  – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

Updated: फेब्रुवारी 13, 2026

By Vivek Sindhu

पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

38 एकर क्षेत्रात विविध स्टॉलची मांडणी 3 दिवस चालणार पशुपक्षी प्रदर्शन

बीड – पशुपालनास कृषीचा दर्जा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे कृषी च्या दराने कर्ज पुरवठा करण्यासोबत पशु पालनासाठी 50 टक्के अनुदान देखील दिले जाणार आहे त्यामुळे या क्षेत्रात मोठया प्रमाणात ग्रामीण उद्योजक तयार होतील आणि यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पशु संवर्धन तथा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी परळी येथील भव्य अशा महा पशुधन एक्सपो 2026 च्या उद्घाटन प्रसंगी केले. 

             परळी येथील अंबाजोगाई मार्गालगत असणा-या ओपळे मैदान येथे हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भव्य अशा 38 एकर मैदानात होणारे हे प्रदर्शन 15 फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे. उद्घाटन प्रसंगी परळीचे आमदार धनंजय मुंडे, पशुसंवर्धन सचिव डॉ. एन. रामा स्वामी, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, पशुसंवर्धन आयुक्त प्रविण देवरे तसेच परळीच्या नगरध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आरंभी प्रदर्शन स्थळी फित कापून व गौपूजन करुन सुरुवात झाली त्यानंतर औपचारिक उद्घाटन सोहळा दीप प्रज्ज्वलन  करुन पार पडला यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

              छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजन तसेच स्व. गोपीनाथ मुंडे आणि स्व. अजित पवार यांना अभिवादन करण्यात आले.

           पशुपालन हा व्यवसाय उद्योगात रुपांतरीत व्हावा यासाठी शासन पुढाकार घेत आहे. या खात्याचा कार्यभार स्विकारल्यावर स्व. अजित पवार यांच्या पुढाकाराने बारामतीसोबत परळी येथील पशु महाविद्यालय आपण मंजूर करुन घेतले. आजचे हे भव्य प्रदर्शन पाहून स्व. अजित पवार आज असते तर त्यानांही आयोजन आवडले असते असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

      देशभरातुन पशू

या प्रदर्शनासाठी देशातील विविध भागातील पशुधन येथे आणले आहे. या ठिकाणी देशातली सर्वात छोटी गाय तसेच विविध प्रजातींच्या गायी, बैल, घोडे आणि बकरे यांच्यासह विविध पक्षी विस्तीर्ण दालनांमध्ये ठेवण्यात आले आहेत.

     या ठिकाणी स्व. अजित पवार यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक स्वतंत्र दालन देखल उभारण्यात आले आहे.

        पशुपालन तंत्रात आलेले नवे बदल तेसच उत्पादकता वाढवणारी आणि पशुंवर उपचार करणारी औषधे या ठिकाणी उपलब्ध आहेत.

          या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची मार्गदर्शपर व्याख्याने स्वतंत्रपणे होत आहेत.

          राज्याचे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस उद्या प्रदर्शनाची पाहणी करण्यासाठी येत आहे. त्याचेही नियोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमानंतर मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.          


Categories

Recent Posts