Breaking
Updated: June 18, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचे अनधिकृत बॅनर प्रशासनाने हटवले
बीड – उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री छगन भुजबळ,महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या दिग्गजांसोबतच चक्क संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याचा फोटो असलेले बॅनर बीडमध्ये मंगळवारी झळकले.
राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बप्पासाहेब घुगे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या समर्थकांनी केलेल्या बॅनरबाजीत हा प्रकार घडला. हे सर्व बॅनर अनधिकृतपणे लावले गेले होते. याची चर्चा सुरु होताच काही तासांत प्रशासनाने हे बॅनर काढले. 7 दिवस हे बॅनर होते हे विशेष. माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मीक कराड हा राष्ट्रवादीच्या कोणत्याही पदावर नाही मात्र त्याचा दरारा जिल्ह्याच्या पक्ष संघटनेत होता.
मुख्य आराेपीचा फोटो पहिल्या ओळीत झळकला.पोलिसांनी वेळीच जरब दाखवली असती, आरोपींची त्याच वेळी धिंड काढली असती तरआज इतर लोकांनी अशा प्रकारे फोटाे लावले नसते. 7 दिवस हे फोटो झळकले.जिल्हाधिकारी व एसपींकडे याची तक्रार गेल्यानंतर हे बॅनर काढले गेले. याला कारणीभूत हेपोलिस प्रशासन आहे. – धनंजय देशमुख, संतोष देशमुखांचे भाऊ
या बॅनरबाजीबाबत बप्पासाहेब घुगे यांना संपर्क केला असता मी बाहेरगावी आलेलो आहे. प्रतिक्रिया काय द्यायची, आता बोलू शकत नाही असे म्हणून त्यांनी फोन ठेऊन दिला. प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिल्याने याबॅनर बाजीबाबत त्यांची भूमिका समजू शकली नाही.
दरम्यान, अटकेत असलेला वाल्मीक कराड याला बीड कारागृहातून इतरत्र हलवावे, फरार कृष्णा आंधळे याला अटक करावी या मागणीसाठी वैजिनाथ सुरवसे यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरु केले आहे.
बप्पासाहेब घुगे हे राष्ट्रवादीचे बीड जिल्हा सरचिटणीस आहेत. शिवसेनेतून त्यांची हकालपट्टी झाली होती. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांना जिल्हा सरचिटणीस हे पद दिले गेले होते.ते कंत्राटदार व हॉटेल व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचा 7 जून रोजी वाढदिवस होता या निमित्ताने त्यांच्यासमर्थकांनी बीड शहरात ही बॅनरबाजी केली होती.मोहिनीराज ग्रुप असे नाव शुभेच्छुक म्हणून आहे.