Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईत लोक विकास महाआघाडीची हवा ; राजकिशोर मोदींसह सर्व उमेदवारांना विजयी करण्यासाठी तरूणाईचा जाहीर पाठिंबा

Updated: नोव्हेंबर 27, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईत लोक विकास महाआघाडीची हवा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel


अंबाजोगाई (प्रतिनिधी) अंबाजोगाई नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक मतदानाची तारीख जस-जशी जवळ येऊ लागली आहे. तस तसा अंबाजोगाई शहरातील युवक वर्ग राजकिशोर मोदी यांच्या नेतृत्वात एकञित होवू लागला आहे. याचाच एक भाग म्हणून गुरूवारी शहरातील नागसेन नगर, रमाई चौक परिसरात राहणाऱ्या काही तरूणांनी लोक विकास महाआघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या युवा मतदारांमुळे युवा नेते संकेत मोदी तसेच राजकिशोर मोदी व त्यांच्या त्या त्या प्रभागातील नगरसेवकपदाचे उमेदवार यांचे पारडे जड झाले आहे. तर लोक विकास महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.नगरपरिषद निवडणूकीत यावेळेस ही सर्व नवतरूणाईने एकवटून अंबाजोगाई नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजकिशोर मोदी तसेच त्यांच्या सर्व नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून आणण्यासाठीचा विडा उचलला आहे. अंबाजोगाई शहरात युवा नेतृत्व संकेत राजकिशोर मोदी यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची साथ देण्यासाठी अंबाजोगाई शहरातील नागसेन नगर, रमाई चौक परिसरात राहणाऱ्या विकास गायकवाड, सतीश जोगदंड, अशोक लोखंडे, प्रज्ज्वल जोगदंड, सोहेल पठाण, दयानंद जोगदंड यांच्यासह काही तरूणांनी लोक विकास महाआघाडी मध्ये अधिकृत प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयाचा मान राखत महाआघाडीत त्यांचे मनापासून स्वागत केले. नव्या ऊर्जेसह आणि सकारात्मक भावनेने पक्षकार्याची वाटचाल सुरू करणाऱ्या या सर्वांना पुढील राजकीय प्रवासासाठी मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. शहराच्या विविध भागातील असंख्य नवतरूण आज बिनशर्तपणे संकेत मोदी तसेच राजकिशोर मोदी यांच्या समर्थनार्थ उभा राहत आहे. या नवतरूणांचा जोश व उत्साह पाहून पुन्हा एकदा मोदी यांच्या हाती शहराच्या विकासाची धुरा देण्याची जनभावना पुन्हा जोमाने उफाळून येऊ लागली आहे. राजकिशोर मोदी यांनी मागील ३० ते ३५ वर्षांपासून अंबाजोगाई शहरासाठी केलेल्या सामाजिक, राजकीय, आर्थिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यावर प्रेरित होऊन आजचा तरूण वर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प करीत आहेत. मोदी यांनी शहरात विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व परिसरातील हजारो विद्यार्थी उच्चशिक्षित केले आहेत. त्याचबरोबर बॅंक, पतसंस्था, मल्टिस्टेट यांच्या माध्यमातून देखील शेकडो तरूण बेरोजगारांना आर्थिक सहाय्य करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना सक्षमपणे उभा केले आहे. बाल- झुंबडच्या माध्यमातून शहर व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना एक हक्काचे सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळेच राजकिशोर मोदी हे नांव अंबाजोगाई शहरातील लहानापासून ते वयोवृद्ध नागरिकांच्या मना मनामध्ये घर करून आहे. त्यामुळे अंबाजोगाईकरांचा आशीर्वाद हा संकेत मोदी व राजकिशोर मोदी यांना व त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हमखासपणे मिळेल असे चित्र दिसून येत आहे.


Categories

Recent Posts