Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

अंबाजोगाईचा सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा जोपासणारे नेतृत्व : नंदकिशोर मुंदडा

Updated: नोव्हेंबर 24, 2025

By Vivek Sindhu

अंबाजोगाईचा सांस्कृतिक, अध्यात्मिक वारसा जोपासणारे नेतृत्व : नंदकिशोर मुंदडा

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई शहराला मराठवाड्याचे पुणे असे संबोधले जाते. कारण येथे पुण्याप्रमाणेच सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि संतपरंपरेची समृद्ध अशी परंपरा आहे. खोलेश्वर, सकलेश्वर यांसारखी हेमाडपंथी मंदिरे, ‘विवेकसिंधु’ या मराठीतील आद्यग्रंथाचे लेखक संत मुकुंदराज स्वामी महाराज यांची समाधी आणि संत दासोपंतांनी लिहिलेली पासोडी या सर्वांनी ही भूमी पावन केली आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी नंदकिशोर मुंदडा यांनी अनेक दशकांपासून अंबाजोगाईकरांच्या सोबतीने आणि सहकार्याने अखंड परिश्रम घेतले आहेत. सांस्कृतिक उपक्रम, पुरातत्व विभागाकडे सातत्याने पाठपुरावा आणि स्थानिकांच्या सहभागातून त्यांनी अंबाजोगाईचा ऐतिहासिक ठेवा जोपासला आहे.

अंबाजोगाईतील प्राचीन सकलेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार, योगेश्वरी देवी मंदिर परिसराचा विकास, हत्तीखाना येथील पुरातन लेणी संवर्धन ही सर्व महत्त्वपूर्ण कामे नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर आली. आ. नमिता मुंदडा यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून या कामांना मंजुरी मिळवून दिली. या उपक्रमांमुळे अंबाजोगाईचा सांस्कृतिक वारसा नव्या दमाने पुढे येऊ लागला.

अश्वरिंगण सोहळा ही तर खरे पश्चिम महाराष्ट्राची ओळख. परंतु, आपल्या भागातून जाणाऱ्या पालख्यांची मोठी संख्या पाहता नंदकिशोर मुंदडा यांनी मराठवाड्यातील पहिला अश्व रिंगण अंबाजोगाईत सुरु केला. या सोहळ्यामुळे अंबाजोगाईची धार्मिक ओळख आणखी बळकट झाली. दरवर्षी पंढरपूर आषाढी यात्रेला निघालेल्या नरसी नामदेव आणि संत जनाबाई यांच्या पालख्यांच्या एकत्रीकरणातून हा रिंगण सोहळा तयार होतो. पालखी आगमनापूर्वी याच मैदानावर विद्यार्थ्यांची वेशभूषा आणि दिंडी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धांमधून बालकांमध्ये संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण होतो आणि त्यांना संत परंपरेचे ज्ञान मिळते. आषाढी परतवारी दिंडी सोहळ्यात नंदकिशोर मुंदडा नियमितपणे सहभागी होतात.

अंबाजोगाईसह केज मतदार संघातील भजनी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी नंदकिशोर मुंदडा यांनी भजन स्पर्धेची सुरुवात केली. अनेक मंडळांना टाळ, मृदुंग यांसारखे भजन साहित्य देऊन त्यांना नवी ऊर्जा दिली. मतदार संघातील प्रत्येक कीर्तनकार, महाराज, मठाधिपती तसेच मतदारसंघातील प्रत्येक धार्मिक व्यक्ती किंवा संस्थेशी काकाजींचा वैयक्तिक स्नेह आहे. त्यांच्या अडीअडचणींमध्ये ते तत्परतेने मदतीला धावून जातात. विजयादशमी निमित्त योगेश्वरी देवीच्या पालखीतील आराधी मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसून त्यांच्यात सहभागी झालेले काकाजी अनेकांनी पाहिले आहेत. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दुर्गामंडळे या सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांनी नेहमीच सहकार्य केले आहे.

अंबाजोगाईची सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि संतपरंपरा टिकवून ठेवण्याचे काम नंदकिशोर मुंदडा यांनी सातत्याने केले. परंपरा जपतांना आधुनिकतेशीही नाळ जोडणारे त्यांचे नेतृत्व शहराच्या सांस्कृतिक विकासाचा आधारस्तंभ बनले आहे. नंदकिशोर मुंदडा यांचे हे कार्य केवळ शहराच्या धर्म-संस्कृतीपुरते मर्यादित नाही, तर सामाजिक ऐक्य, परंपरा आणि वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक ठोस प्रयत्न आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.


Categories

Recent Posts