Breaking
Updated: July 21, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupअंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व केज तालुक्यातील मस्साजोग येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी बिअरबार व बिअर शॉपी फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबाजोगाई शहरात राजवीर बिअर शॉपी फोडली
दि. १९ जुलै २०२५ रोजी रात्री १० वाजेपासून ते २० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान अंबाजोगाई शहरातील श्रीकृष्ण नगर, मानवलोकजवळ असलेल्या राजवीर बिअर शॉपीत चोरट्यांनी दुकानाचे शटर, कडी, कोंडा व कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला. या ठिकाणाहून बिअरसह ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेण्यात आला आहे. या प्रकरणी व्यंकटेश नागनाथ गंजेवार (वय २६, रा. कृष्णाई नगर, अंबाजोगाई) यांनी फिर्याद दिली आहे.
मस्साजोग येथील अभिषेक बिअर बारमध्ये चोरी
याच दरम्यान केज तालुक्यातील मस्साजोग येथे अभिषेक बिअरबार परमीट रूम या ठिकाणीही चोरीची घटना घडली आहे. बालासाहेब कुंडलिक गायकवाड (वय ५०, व्यवसाय शेती, रा. मस्साजोग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, १९ जुलै रोजी रात्री १० वाजल्यापासून ते २० जुलै रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी हॉटेलचे गेट व गोडावूनची कुलुपे तोडून आत प्रवेश केला. या ठिकाणाहून चोरट्यांनी विविध प्रकारच्या विदेशी दारूचे बॉक्स व रोकड असा एकूण १,५२,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या दोन्ही घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.