Breaking
Updated: जानेवारी 31, 2026
इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शिक्षणासोबतच देशभक्ती, संस्कार व संस्कृतीचे धडे - राजकिशोर मोदी
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelअंबाजोगाई (प्रतिनिधी) – मोदी लर्निंग सेंटर येथील श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू व्हिजन पब्लिक स्कूल आणि टोडलर्स व्हिले प्री-स्कुल यांचे व्हिस्टा – २०२५-२६ हे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन अंबाजोगाई येथे सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी शाळेच्या भव्य प्रांगणात उत्साहात करण्यात आले. या स्नेहसंमेलनातून छत्रपती शिवरायांचा स्वराज्यनिर्मितीच्या प्रेरणादायी इतिहासाचे सजीव दर्शन घडले. यावेळी बोलताना संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, दरवर्षी वेगवेगळी थीम असते. यावर्षी छत्रपती शिवराय स्वराज्याचे शिल्पकार ही स्नेह संमेलनाची थीम आहे. वंदनीय महाराजांचा प्रेरक इतिहास मांडून विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. न्यु व्हिजन पब्लिक स्कूलच्या माध्यमातून इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शिक्षणासोबतच देशभक्ती, संस्कार व संस्कृतीचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात असे मोदी म्हणाले.
न्यू व्हिजन पब्लिक स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचा अतिशय दिमाखदार उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी होते. तर व्यासपीठावर संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, मार्गदर्शक वसंतराव चव्हाण, डॉ.डी.एच.थोरात, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.नवनाथ घुगे, डॉ.विश्वजीत पवार, श्रीमती सविता बनाळे, संतोष पवार, सौ.डिंपल संकेत मोदी, डॉ.मनिषा पवार, सौ.सुनिता मोदी, शाळेचे प्राचार्य एन.प्रशांत कुमार, विद्यार्थी प्रतिनिधी शिवेंद्रसिंह कणसे, विद्यार्थीनी प्रतिनिधी आरोही पवार यांच्या शुभहस्ते मूर्तीपूजन आणि दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार, पुष्पांजली अर्पण व दीपप्रज्ज्वलन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. स्नेहसंमेलनात वार्षिक अहवाल सादर करताना शाळेचे प्राचार्य एन.प्रशांत कुमार यांनी सांगितले की, न्यू व्हिजन पब्लिक स्कूल विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी संपूर्ण शैक्षणिक वर्षात स्पर्धा परीक्षा, संशोधन, स्वयं अध्ययन, मैदानी स्पर्धा, प्रकल्पांना क्षेत्र भेट, विविध दिन साजरे करणे इत्यादी उपक्रम राबविते. सोबतच सांस्कृतिक उपक्रमाला प्रोत्साहन देते. न्यू व्हिजन पब्लिक स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुसज्ज व प्रशस्त संगणक लॅबच्या द्वारे डिजिटल शिक्षण, सायन्स, टेक्नॉलॉजीचे अद्ययावत ज्ञान दिले जाते, संस्थेचे कार्यकारी संचालक संकेत मोदी व सौ.डिंपल संकेत मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार न्यु व्हिजन पब्लिक स्कूलमध्ये सर्व शैक्षणिक साहित्य, सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नवनव्या संकल्पना राबविण्यात येत आहेत. पालक-विद्यार्थी मेळावा, विज्ञान प्रदर्शन, भव्य क्रीडांगणावर क्रीडा महोत्सव यातून युकेजी, युकेजी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देत आहोत. वार्षिक शैक्षणिक प्रगती तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा क्षेत्रातील विशेष प्रगती या बाबतीत माहिती स्क्रीन द्वारे देवून आगामी काळात ही संस्था पालकांचा विश्वास सार्थ ठरवेल अशी ग्वाही प्राचार्य एन.प्रशांत कुमार यांनी दिली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अनम शेख व अर्पिता दरगड या विद्यार्थीनींनी केले. यंदाच्या स्नेहसंमेलनाची थीम छत्रपती स्वराज्याचे शिल्पकार अशी होती. पूर्व प्राथमिक ते उच्च माध्यमिक वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत स्नेहसंमेलनात नाट्यप्रयोग, नृत्याचे व सांस्कृतिक कलेचे सादरीकरण केले. यावेळी उत्साहवर्धक आणि आई भवानी मातेची पारंपारीक गीतं सादर केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, अष्टप्रधानमंडळ, मावळे यांची शिवकालीन वेशभूषा साकारून शिवरायांच्या पराक्रमाचे आणि स्वराज्यनिर्मितीच्या प्रेरणादायी इतिहासाचे सजीव दर्शन घडविले. कार्यक्रमात राजमाता माँसाहेब जिजाऊ यांनी केलेल्या संस्कारांमुळे घडलेले शिवाजी महाराज या विषयावर विशेष सादरीकरण करण्यात आले. राजमाता जिजाऊंनी शिवरायांवर रूजविलेला स्वाभिमान, मातृभूमी प्रेम, अन्यायाविरूद्ध लढण्याची वृत्ती व उत्तम नेतृत्वगुण यांचा प्रभावी उलगडा या सादरीकरणातून करण्यात आला. राजमाता जिजाऊंच्या संस्कारांतून घडलेले शिवराय हेच स्वराज्याच्या स्थापनेचे शिल्पकार ठरले, असा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांनी भव्य दिव्य व्यासपीठावर कलात्मक सादरीकरणातून दिला. यावेळी शिवकालीन आकर्षक सजावट, देखावा तयार करण्यात आला होता. या उपकृमातून न्यू व्हिजन पब्लिक स्कूल, अंबाजोगाई या शाळेने विद्यार्थ्यांमध्ये स्वाभिमान नेतृत्व क्षमता या मूल्यांचा विकास करणारा योग्य तो धडा देण्यात आला. संस्थेचे संस्थापक सचिव राजकिशोर मोदी, कार्यकारी संचालक संकेत मोदी यांच्या अभिनव अशा संकल्पनेतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण देणे आणि त्यांना संस्कारशील बनवणे या हेतूने ही थीम ठेवण्यात. पापा मोदी हे सतत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून अंबाजोगाई शहर व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारे शिक्षक यांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक संकल्पना राबवितात. मागील वीस वर्षांपासूनची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम आहे. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित मान्यवर, पालक व नागरिकांकडून मोठ्या टाळ्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालकांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहसंमेलनाने परिसरात देशभक्ती, संस्कार आणि संस्कृतीप्रेमाचे प्रेरणादायी वातावरण निर्माण केले. प्रारंभी प्रास्ताविक हेडबॉय शिवेंद्रसिंह कणसे याने केले. याप्रसंगी अंबाजोगाई नगरपालिकेचे नगरसेवक महेश कदम, नगरसेवक प्रतिनिधी सचिन जाधव, दत्तात्रय सरवदे, माजी नगरसेवक राजेंद्र मोरे, टि.बी.गिरवलकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य एल.व्ही.बगले, अभियांत्रिकी महाविद्यालयातील विभागप्रमुख डॉ.विवेकानंद राजमान्य, प्रा.सुरेश बिराजदार, ऍड.दयानंद लोंढाळ, डॉ.संदीप थोरात, माजी प्राचार्य सि.व्ही.गायकवाड, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, पत्रकार प्रशांत लाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, माता – पिता पालक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी न्यु व्हिजन पब्लिक स्कूल व टोडलर्स व्हिले प्री-स्कुल यांच्या सर्व विभागप्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांच्या वतीने पुढाकार घेण्यात आला.