Breaking

‘त्या’ अपघातातील दोन्ही जखमींचा मृत्यू; मृतांची संख्या सहावर

Updated: ऑगस्ट 30, 2025

By Vivek Sindhu

WhatsApp Image 2025 08 30 at 10.59.07 15652072

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड दि.३० : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बीड तालुक्यातील नामलगाव फाटा येथील एसआर जीनिंगजवळ शनिवारी (दि.३०) सकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात मृतांची संख्या सहावर पोहोचली आहे. भरधाव कंटेनरने (एमएल-01 एजी-3197) सहा जणांना चिरडले होते. यापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी असलेले दोघे उपचारादरम्यान दगावले.

या अपघातात दिनेश दिलीप पवार (रा. माऊली नगर, बीड), पवन शिवाजी जगताप (रा. अंबिका चौक, बीड), अनिकेत रोहिदास शिंदे (रा. शिदोड, ता. बीड), किशोर गुलाब तोर (रा. बाभूळतारा, ता. गेवराई), आकाश अर्जुन कोळसे (रा. रिलायन्स पंप परिसर, बीड) आणि विशाल श्रीकिसन काकडे (वय २२, रा. शेकटा, ता. शेगाव) या सहा जणांचा मृत्यू झाला आहे. हे सहाही युवक पायी चालत पेंडगाव येथे मारुतीरायाच्या दर्शनासाठी जात होते. नामलगाव उड्डाणपूल पार करून पुढे एसआर जीनिंगजवळ ते चालत असताना पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्यांना चिरडले.

घटनेनंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक बाळराजे दराडे, प्रसाद कदम तसेच महामार्ग पोलीस गजानन जाधव, बालाजी ढगारे, तात्या बांगर, सदगर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरचे दोन्ही चालक ताब्यात घेतले. मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. महामार्गाला सर्विसरोड नसल्याने अशा अपघातांचे प्रमाण वाढले असून या भीषण दुर्घटनेने जिल्हाभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts