Breaking

अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

Updated: नोव्हेंबर 10, 2025

By Vivek Sindhu

अज्ञात वाहनांच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जखमी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

केज – अज्ञात वाहनाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना केज – कळंब रस्त्यावरील माळेगाव येथे ९ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास घडली.
केज शहरातील ख्वाजा कुरेशी व त्यांच्या सोबत सूर्यवंशी नामक तरुण हे दोघे दुचाकीवरून केज – कळंब रस्त्यावरून जात असताना माळेगांव ते साळेगाव दरम्यान असलेल्या एका ढाब्याजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात ते दोघे जखमी झाले. ख्वाजा कुरेशी या तरुणास गंभीर मार लागला असून सूर्यवंशी हा किरकोळ जखमी झाला आहे. ही माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे आणि फौजदार मांजरे यांनी दोघाना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.


Categories

Recent Posts