Breaking

अजितदादा लोकांच्या मनातील नेते, त्यांनी कधीच जातीधर्माचा विचार केला नाही

Updated: जानेवारी 31, 2026

By Vivek Sindhu

अंबाजोगाई येथे शोकसभा ; शोकाकुल वातावरणात सर्वपक्षीय शोक संवेदना

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

अंबाजोगाई येथे शोकसभा ; शोकाकुल वातावरणात सर्वपक्षीय शोक संवेदना

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अजितदादा पवार हे कर्तृत्ववान, शिस्त, वक्तशीरपणा, दिलेला शब्द पाळणारे, कार्यकर्त्यांवर जिवापाड प्रेम करणारे व लोकांच्या मनातील नेते होते. त्यांनी कधीच जातीधर्माचा विचार केला नाही. अशा शोकभावना व्यक्त करून शोकाकुल वातावरणात अंबाजोगाई येथे लोक विकास महाआघाडीचे नेते राजकिशोर मोदी यांच्या पुढाकाराने शुक्रवारी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील वेणुताई चव्हाण महिला महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात, अंबाजोगाई बस स्टॅण्ड समोर शुक्रवार, दिनांक ३० जानेवारी रोजी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना माजी आमदार संजय दौंड यांनी आपले स्वअनुभव कथन केले. ते उत्तम राजकारणी तर होतेच, पण मनाने शेतीनिष्ठ शेतकरीही होते. दादा मातीशी जुळलेले नेतृत्व होते असे त्यांनी सांगितले. तर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आपले स्वअनुभव कथन केले. दादा हे शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे पाईक होते. प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मान देणारे, ग्रामीण भागाच्या प्रश्नांची जाण असणारे नेते होते असे माजी आ‌.साठे म्हणाले. प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी सांगितले की, दादांची प्रशासनावर पकड होती. कार्यकर्त्यांना बळ देणारे, नियमांनुसार प्रत्येकाचे काम करणारे, शिस्तप्रिय, सर्वांना सोबत घेऊन चालणारे, विकासाचा दृष्टिकोन जोपासणारे नेतृत्व म्हणून दादांकडे पाहता येईल. दादांच्या समाजसेवेचा वारसा आपण जोपासू असे मोदी म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दादा हे सर्वांना आपले वाटावे असे विकासप्रिय नेतृत्व होते. त्यांचे स्वप्न आपण सर्वजण एकत्र येऊन पुर्ण करू असे चव्हाण म्हणाले. भाजपा नेते अक्षय मुंदडा यांनी आपले स्वअनुभव कथन केले. दादांनी कर्तव्यनिष्ठा, शिस्त जोपासत प्रामाणिकपणे काम केले. दादांचे पद कोणीही घेईल पण, त्यांची जागा कोण घेणार असा प्रश्न मुंदडा यांनी उपस्थित केला. डॉ.नरेंद्र काळे यांनी दादा गेले यावर अजूनही विश्वास बसत नाही. पक्ष एक होत असताना दादांचे जाणे दुर्दैवी असल्याचे डॉ.काळे म्हणाले. दत्तात्रय पाटील यांनी दादांविषयीचे आपले स्वअनुभव कथन केले. उपनगराध्यक्ष दिनेश भराडीया यांनी दादा हे असे एकमेव नेते होते ज्यांनी आपल्या कामातून ते कामाचा माणूस आहेत हे सिद्ध केले असे भराडीया यांनी सांगितले. नगरसेवक बबनराव लोमटे यांनी दादांनी बीड जिल्ह्याला शिस्त लावली. ते सर्व विषयांत पारंगत होते असे सांगितले. सतिश लोमटे यांनी दादांविषयीचे आपले स्वअनुभव कथन केले. सर्वधर्मसमभाव जोपासणारे नेतृत्व म्हणून दादांकडे पाहता येईल असे ते म्हणाले. यावेळी ज्येष्ठ संपादक अशोकराव गुंजाळ, कॉ.बब्रुवाहन पोटभरे, रामभाऊ कुलकर्णी, ऍड.अनंतराव जगतकर, डॉ.डी.एच.थोरात, गणपत व्यास, महेंद्र निकाळजे, दगडू लोमटे, ऍड.शिवाजी कांबळे, प्रा.रोहिणी पाठक, डॉ.सुलभा पाटील, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार, शाहेबाज मणियार, हाजी खालेक कुरेशी, गणेश देवकते, श्रीधर गरड, डॉ.राजेश इंगोले, ऍड.अजित लोमटे, बालासाहेब दोडतले, व्यंकटेश चामनर, ऍड.इस्माईल गवळी यांनी आपल्या सहवेदना शोकभावना व्यक्त केल्या. यावेळी नगरपालिका, अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी, केज विधानसभा मतदार संघ, मराठवाडा जनता विकास परिषद, मराठवाडा साहित्य परिषद, कुणबी विकास मंच, अंबाजोगाई पिपल्स बँक, श्री योगेश्वरी नागरी सहकारी पतसंस्था, श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला नागरी सहकारी पतसंस्था, मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, मराठी पत्रकार परिषद वैद्यकीय कक्ष, वकील संघ, ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, स्व.भागवानराव लोमटे बापू कुटुंबिय, वेणूताई चव्हाण प्रतिष्ठान, योगेश्वरी शिक्षण संस्था, येल्डा पंचक्रोशी, यशवंत सेना, भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, डेंटल कौन्सिल परिषद महाराष्ट्र राज्य, बनेश्र्वर शिक्षण संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), भारतीय जनता पक्ष, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना (उबाठा), मुस्लिम समुदाय यांच्या तर्फे ३१ जणांनी आपल्या लोकभावना व्यक्त केल्या. शोकसभेचे सुत्रसंचालन कवी भागवत मसने‌ यांनी केले. तर त्यांना मुख्याध्यापक आनंद टाकळकर यांनी सहकार्य केले. शोकसभेला राजपाल लोमटे, राजेभाऊ औताडे, अमर देशमुख, नगरपरिषद गटनेते सय्यद ताहेरभाई, नगरसेवक महेश लोमटे, नगरसेवक आकाश कराड, नगरसेवक महेश कदम, नगरसेवक संभाजी जावळे, नगरसेवक प्रतिनिधी अकबर पठाण, अमोल लोमटे, सचिन जाधव, जावेद गवळी, प्रकाश सोळंकी, प्रा.वसंतराव चव्हाण, विशाल जाजू, पुरूषोत्तम चोकडा, दिलीप काळे, मनोज लखेरा, खालेद चाऊस, सुनिल वाघाळकर, अशोक जेधे, गणेश मसने, कचरूलाल सारडा, ताराचंद शिंदे, बाळासाहेब सोनवणे, शेख मुख्तार, सय्यद रशीदभाई, मदनलाल परदेशी, कल्याण भिसे, राजेंद्र मोरे, प्रा.शैलेष जाधव, सुहास मोहिते, सुशीलकुमार वाघमारे, अंकुश हेडे, पंडित हुलगुंडे, कृष्णा लोमटे, अनिस मोमीन, सि.व्ही.गायकवाड, रूपेश चव्हाण, सिध्दु लोमटे, सुभाष बाहेती, अशोक हेडे, शंकर भिसे, सुभाष पानकोळी, संजय कोंबडे, ईश्वर शिंदे, वसंतराव मोरे, तारेखअली उस्मानी, दत्ता देवकते, रणजित मोरे, अंगदराव तट, राजू अन्सारी, विजय रापतवार, डॉ.वनमाला रेड्डी, संजीवनी देशमुख, चंद्रकला देशमुख, उषा यादव, अनिल पसारकर, डॉ.धर्मपात्रे, तानाजी देशमुख, सुहास चंदनशिव, देविदास जाधव, रवि देशमुख, पत्रकार अविनाश मुडेगावकर, प्रकाश लखेरा, अभिजीत गाठाळ, रणजित डांगे, दत्तात्रय अंबेकर, संजय जोगदंड, नईम सय्यद, संभाजी मस्के आदींसह अंबाजोगाईतील राजकीय, सामाजिक, स्वयंसेवी, शिक्षण, वैद्यकीय, विधी, शेती, सहकार, साहित्य, संगीत, पत्रकारीता, कला, नाट्य, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापार, उद्योग आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणारे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते‌.


Categories

Recent Posts