बीड – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील मुख्य इमारतींचे  इलेव्हेशन प्लॅन, श्री क्षेत्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग मंदिर विकास आराखडा, स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय आराखडा, ग्रंथालय इमारत, सहकार संकुल आदी विविध विकास कामांचा आढावा घेतला.