Breaking
Updated: June 12, 2025
WhatsApp Group
Join Nowअहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबाद शहरातील मेघानीनगर परिसरात आज एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे विमान एअर इंडियाचे असल्याचे समजते. रहिवासी भागातच हे विमान कोसळल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह २४२ प्रवासी असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अवघ्या काही क्षणांत तीन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. विअमानाची क्षमता ३०० प्रवाशांची असून त्यात २४२ प्रवासी होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी हे देखील या विमानात प्रवास करत असल्याची शक्यता आहे. लंडनला जाण्यासाठी अहमदाबाद विमानतळावरून या विमानाने १.३१ वाजता उड्डाण केले आणि १.३८ वाजता विमानाने शेवटचा संपर्क केला आणि ते कोसळले.
अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. विमानातील प्रवाशी आणि रहिवासी वस्तीत कोसळल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
#aeroplanecrash #ahmedabad #ahmedabadplanecrash #planecrash #airindia