केज – अज्ञात वाहनाने रस्त्याने पायी चालत चाललेल्या पदचाऱ्यास जोराची धडक दिल्याने पदचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज – मांजरसुंबा रस्त्यावर मंगकवरी रात्री उशिरा घडली.
कानडीघाट (ता. बीड) येथील भागवत संपत अडागळे (वय ४५) हे सारूळ फाट्याजवळ असलेल्या रेणुका कला केंद्रावर तबला वादक म्हणून कामाला होते. ते मंगळवारी रात्री कला केंद्राजवळील एका हॉटेलवर जेवण करण्यास गेले होते. जेवण करून परत कला केंद्राकडे येत असताना केज – मांजरसुंबा रस्त्यावरून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने भागवत अडागळे हे जागीच ठार झाले. त्यांना उपचारासाठी केजच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. बुधवारी सकाळी सहाय्यक फौजदार राजू वाघमारे व जमादार राजू वंजारे यांनी शवविच्छेदन करून घेत मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला.