Breaking
Updated: एप्रिल 2, 2026
बीड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज: बस स्थानकावर एका वयोवृद्ध व्यक्तीला ‘चमत्कार’ दाखवण्याचे आमिष दाखवून त्यांची सोन्याची अंगठी लंपास करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. १ फेब्रुवारी २०२६ रोजी फिर्यादी भीमा सोनाजी जाधवर हे उपचारासाठी पुण्याला जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना, दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना गाठले आणि हातचालाखीने त्यांची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून नाशिक जिल्ह्यातील येवला येथून अमजद नबाब मदारी याला ताब्यात घेतले आहे.
तपासादरम्यान आरोपीने आपला साथीदार अशफाक राजू मदारी याच्यासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून २४,००० रुपये किमतीची अंगठी आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत आणि अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली. सध्या अटकेतील आरोपीला पुढील कारवाईसाठी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.