Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

मोटार सायकल वर दोघांच्या मध्ये बसवून गावाकडे परत येत असलेल्या मित्राच्या अल्पवीन मुलीचा केला विनयभंग 

Updated: फेब्रुवारी 18, 2026

By Vivek Sindhu

आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी

गौतम बचुटे/केज :- मित्राच्या अल्पवयीन मुलीला मोटार सायकलवर दोघांच्यामध्ये बसवून गावाकडे परत येत असताना चालत्या मोटर सायकलवर तिच्याशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केल्याची घटना केज तालुक्यात घडली आहे.

दि. १६ फेब्रुवारी रोजी केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीच्या कान दुखत असल्याने रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास तिचे वडिल व त्यांचा एक मित्र हे तिला धनेगाव येथील दवाखान्यात घेऊन गेले होते. दवाखान्यात जातेवेळी त्यांनी सोबत त्यांचा मित्र किशोर कांबळे याला घेतले होते. मुलीच्या कान दुखीवर उपचार करून रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास ते तिघे मोटार सायकलवरून गावाकडे परत जात असताना, मुलीचे वडील मोटार सायकल चालवित होते. मुलीचे वडील व त्यांचा मित्र किशोर कांबळे या दोघांच्या मध्ये त्यांची अल्पवयीन मुलगी बसलेली होती. चालत्या मोटर सायकलीवर किशोर कांबळे याने त्याच्या मित्राच्या अल्पवयीन मुलीशी असभ्य वर्तन करून तिचा विनयभंग केला. मुलीने तिच्याशी झालेल्या असभ्य वर्तनाची माहिती तिच्या पालकांना दिल्या नंतर त्यांनी किशोर कांबळे याच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 

त्यावरून किशोर कांबळे याच्या विरुद्ध युसुफवडगाव पोलिस ठाण्यात गु. र. नं. ४१/२०२६ भा. न्या. सं. ७४, ७५ यासह पोक्सोचे कलम ८,  १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी किशोर कांबळे याला अटक केली आहे. 

किशोर कांबळे याला न्यायालया समोर हजर केले असता त्याला दि. १८ फेब्रुवारी पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणाचा तपास पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे करीत आहेत.


Categories

Recent Posts