Breaking
Updated: मार्च 30, 2026
गेवराई बायपासवरील अपघात
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelगेवराई: हायवे रोडने पायी चालत जात असलेल्या एका शेतकऱ्याला अज्ञात कारने समोरून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की धडक दिल्यानंतर कार चालक आपल्या वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मिळालेली माहिती अशी की, बाबासाहेब यशवंत मुगुटराव (वय ४४, रा. बागपिंपळगाव कॅम्प) हे रविवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास हायवे रोडच्या कडेने शहागडच्या दिशेने कॅनॉलकडे पायी चालत जात होते. यावेळी शहागडकडुन येणाऱ्या एका पांढऱ्या रंगाच्या कारने (क्रमांक MH 44 Z 7802) त्यांना समोरून जोराची धडक दिली. या धडकेत बाबासाहेब मुगुटराव यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयताची पत्नी सारिका बाबासाहेब मुगुटराव (वय ३७) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गेवराई पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी कलम १०६(१), २८१, १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४/१७७ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार हबर्डे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार कार चालकाचा शोध घेतला जात आहे.