Breaking
Updated: मार्च 26, 2026
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज :- वैद्यकीय शाखेत प्रवेश देण्याचे अमिष दाखवून महाराष्ट्रासह इतरही राज्यातही अनेकांची फसवणूक करणारा आणि कोट्यावधी रु ची फसवणूक करणाऱ्या एका महाठकाचा ठावठिकाणा शोधून त्याच्या मुसक्या आवळल्या प्रकरणी अत्यंत महत्वाची भूमिका आणि सहभाग असलेले सायबर क्राइम शाखेचे तांत्रिक माहिती आधारे ठावठिकाणा शोधणारे पोलिस नाईक अनिल मंदे यांचा जिल्हा पोलिस अधीक्षक
जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव केला आहे.
केज येथे उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले अनिल मंदे यांनी धारूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका
गु.र.नं. ४५३/२०२५, भा न्या सं ३१८(४) अंतर्गत बारामती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. तिडके यांच्या पदव्युत्तर शिक्षण एम डी साठी ८ लाख रुपये घेऊन फसवणूक केली होती. धारुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या नंतर अनिल मंदे यांनी आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाच्या सहाय्याने शोध घेवून त्यास अटक केली. या गुन्ह्याचे तपासा दरम्यान त्यांनी अचूक माहिती संकलन व तांत्रिक तपास पद्धतीचा प्रभावी वापर करून आरोपीस अटक करण्यास पोलिस पथकाला मदत केली. तसेच सदर आरोपीचा पुर्व इतिहास तपासला असता सदर आरोपी सौरभ कुलकर्णी हा महाराष्ट्रासह अन्य राज्यात १४ गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड होता.
पोलिस नाईक अनिल मंदे यांनी केलेल्या या तांत्रिक, नियोजनबद्ध व प्रभावी तपासामुळे गंभीर फसवणुकीचा गुन्हा उघडकीस येऊन मोठया प्रमाणावर गुन्हे दाखल असलेला आरोपी ताब्यात मिळुन आला आणि इतर गुन्हयांमध्ये देखील सदर आरोपीस ताब्यात घेण्यात यश मिळाले. यामुळे गुन्हेगारीवर आळा बसण्यास व नागरिकांचा पोलीस दलावरील विश्वास दृढ होण्यास मोठी मदत झाली.
या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पोलिस नाईक अनिल मंदे यांचे प्रशस्ती पत्रक अभिनंदन केले. यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, अप्पर पोलिस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलिस अधीक्षक व्यंकट राम हे उपस्थित होते.
तसेच अनिल मंदे यांनी यापुढे भविष्यात अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करून बीड जिल्हा पोलीस दलाचे नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.