Breaking
Updated: June 2, 2025
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channel‘विवेक सिंधु' व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करा
Join Groupअंबाजोगाई (प्रतिनिधी) – विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्यरत असलेल्या आकाश इन्स्टिट्यूट अंबाजोगाई शाखेचे भव्य उद्घाटन शनिवारी, दिनांक ३१ मे २०२५ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
कार्यक्रमास खा. बजरंग सोनवणे, माजी आमदार संगीता ठोंबरे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, प्रा. नानासाहेब गाठाळ, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे, नगरसेवक बबन लोमटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, आकाशचे रिजनल हेड जीन थॉमस जॉन, आर.बी.एम. आर.के. सिंग, आर.बी.एम. वसंता, विष्णू घुगे, अॅड. शिवाजीराव कराड आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात अंबाजोगाई शहर व परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थी, पालक, शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आकाश इस्ट्टियूटचे संचालक मनोज थोरात यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
रिजनल हेड जीन थॉमस जॉन यांनी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन केले. JEE/NEET परीक्षांची तयारी कशी करावी, अभ्यासात सातत्य कसे ठेवावे, पालकांची भूमिका, विषयांचे योग्य नियोजन अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी सविस्तर विवेचन केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. यावेळी अनेक पालक व विद्यार्थ्यांनी आकाश इस्ट्टियूटमध्ये नाव नोंदणी करून आपल्या करिअरला योग्य दिशा देण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी आकाश इन्स्टिट्यूटच्या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी संस्था करत असलेल्या कार्यास शुभेच्छा दिल्या.