Breaking
Updated: मार्च 4, 2026
माजलगावमध्ये चाकूने वार करून तरुणाला जखमी केले
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelमाजलगाव शहरातील धारूर रोडवरील एका हॉटेलसमोर पैशांच्या वादातून एका १६ वर्षीय मुलावर चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना १ मार्च रोजी घडली. फिर्यादी फैजान महेबुब शेख याला आरोपी नेहाल अकबर शेख आणि त्याच्या साथीदाराने अडवून शिवीगाळ केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपीने फैजानच्या पाठीवर चाकूने वार करून त्याला रक्तबंबाळ केले. या हल्ल्यात फैजान गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शहर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा नोंदवला आहे.