Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

कंबरेला गावठी कट्टा लावून फिरणारा जेरबंद

Updated: फेब्रुवारी 19, 2026

By Vivek Sindhu

कंबरेला गावठी कट्टा लावून फिरणारा जेरबंद

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

बीड – शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात एक विधीसंघर्ष बालक कंबरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच आज (दि.१९) रोजी कारवाई करत त्यास त्याब्यात घेण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सुरू असलेल्या बंदोबस्तादरम्यान एक विधीसंघर्ष बालक कंबरेला गावठी कट्टा लावून शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात थांबलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई करत संबंधित विधीसंघर्ष बालकास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.सदरील कारवाई नवनीत काँवत पोलीस अधीक्षक बीड, सचीन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, तसेच शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज जारवाल, पोउपनि श्रीराम खटावकर, पोलीस हवालदार अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, बाळू सानप, आनंद मस्के, अर्जुन यादव, मनोज परजणे व चालक सिद्धेश्वर मांजरे यांनी केली.


Categories

Recent Posts