Breaking
Updated: मार्च 20, 2026
दारू पिण्यावरून एकाच्या डोक्यात थम्सअपची बाटली मारली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज शहरातील वकीलवाडी भागातील शंकर सदाशिव कसबे (वय ३०) व त्याचा मित्र राजपाल आश्रुबा मनेरी (रा. प्रशांत नगर, केज) हे दोघे १९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता बंटी गायकवाड यांच्या बियरबारमध्ये दारू पीत बसले होते. याचवेळी राजपालचा लहान भाऊ गणेश आश्रुबा मनेरी हा येऊन त्यांच्यासोबत दारू पिण्यास बसला. त्यास तू आमच्या पेक्षा लहान आहेस, तू दारू पिण्यास बसू नको, असे शंकर कसबे म्हणाले असता गणेश याने लाथाबुक्यांनी मारहाण करीत टेबलावरील रिकामी थम्सअपची बाटली डोक्यात मारून शंकर याचे डोके फोडले. जीवे मारण्याची धमकी दिली. अशी तक्रार शंकर कसबे याने दिल्यावरून गणेश मनेरी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक त्रिंबक सोपणे हे करताहेत.